बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिला ओरडत असतानासुद्धा चालत्या गाडीला रोखून केला अश्लील स्पर्श, निर्लज्ज गुंडांचा व्हिडीओ व्हायरल

लखनऊ | देशात दिवसेंदिवस महिला, मुली असुरक्षित असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशातच बिहारमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या संतापजनक व्हिडीओवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल होणारा व्हिडीओ हा बिहारमधील दरिहरा सरैया गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये काही गुंड महिलेची छेडछाड करताना दिसत आहेत. महिलेला असभ्यरित्या कुठेही स्पर्श करताना दिसत आहेत. या दरम्यान महिला प्रचंड घाबरली असून तिने बराच आरडा ओरडा केला. तरी देखील गुंड थांबले नाहीत.

संबंधित महिला आपल्या प्रियकरासोबत जंगलात असताना गुंडांनी त्यांना पकडलं होतं. यानंतर बराच वेळ विचारपूस करुन गुंडांनी महिलेच्या प्रियकराला मारहाण केली आणि महिलेला त्रास दिला. अनेक वेळा विनंती केल्यानंतर गुंडांनी त्यांची वाट सोडली.

दरम्यान, हा व्हिडीओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख अरुण कुमार यादव यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अरुण यांनी नितीश सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर 3 जणांचा शोध सुरु आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

शेवटी आईच ती! आर्यनला कोठडीत घेऊन गेली बर्गर

बापरे! सर्वसामान्यांचा ताण वाढला, गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

पहाटे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान, 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

पुणे मेट्रोसंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More