Top News पुणे

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही!

पुणे | यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्तच्या दिंड्यांना पंढरपूरात परवानगी नाकारण्यात आलीये. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत.

महाराष्ट्रातील जिल्ह्यातून कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात दिंड्या दाखल होतात. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत तसंट सोशल डिस्टन्सिंगचे पाळून करण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर अजूनही नियंत्रण मिळालेलं नाही. 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या यात्रेत गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

देवस्थानात नित्योपचार हे कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत. याबाबत पोलीस तसंच जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेत.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या