बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! आज बाधितांचा आकडा हजाराच्या आत तर…; वाचा आजची आकडेवारी

 पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 684 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 66 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 23 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1402 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,59,987 इतकी आहे. तर पुण्यात 18,440 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7749 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 433798 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7862 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

‘किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?’; पवारांचा मोदी सरकारला सवाल 

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 अत्यंत महत्त्वाचे”

अमृता फडणवीसांच्या त्या ट्विटला रूपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या….

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More