गडकरींच्या कार्यक्रमात पत्रकारांना ५०० रुपयांच्या नोटा वाटल्या!

नवी दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना पाकिटातून ५०० रुपयांच्या नोटा वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ओडिशातील अंगुलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. 

विविध कामांचा शुभारंभ करण्यासाठी गडकरी अंगुलमध्ये गेले होते. यावेळी पत्रकारांना प्रेसनोट सोबत पाकिटातून ५०० रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. 

दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी आयोजकांकडे तक्रार केली तसेच एका पत्रकाराने पोलिसातही गुन्हा दाखल केलाय.

पाहा व्हिडिओ-

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा