पंकजा मुंडेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; ओबीसींकडून जिंतूर बंदची हाक

Offensive comments on Pankaja Munde Post Parbhani Banned

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) पोस्टवर परभणीतील एका युवकाने अक्षेपार्ह कमेंट केल्याने जिंतूर बंदची हाक ओबीसी समाजाकडून होताना दिसत आहे. बीड पाठोपाठ आता अशीच घटना परभणीमध्ये घडली आहे. जिंतूरमध्ये वातावरण चांगलं तापलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून जिंतूरमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

अल्पवयीन तरूणावर गुन्हा दाखल

पोस्टवर कमेंट करणारा युवक हा अल्पवयीन आहे. त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंविरोधात (Pankaja Munde) आक्षेपार्ह पोस्टनंतर बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बीड जिल्ह्यातील अनेक गावांनी तेव्हा बंदची हाक दिली होती. यामध्ये बीड, पाथर्डी, वडवणी, शिरुर या गावांचा समावेश होता.

अशातच आता एका तरूणाने सोशल मीडियावर एक कमेंट केली आहे. याचेच पडसाद आता परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे उमटले आहेत. यामुळे आता जिंतूर येथे ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे.

आक्षेपार्ह पोस्ट, तणावाचं वातावरण

बीड लोकसभा मतदारसंघातील निकाल हा बीडकरांसाठी आणि भाजपसाठी धक्कादायक होता. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. त्यांच्या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला.

याच संदर्भात आता पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) एका पोस्टवर एका युवकाने आक्षेपार्ह कमेंट केली आहे. युवकाने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असल्याचा एक व्हिडीओ टाकला होता. तसेच व्हिडीओ खाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

News Title – Offensive comments on Pankaja Munde Post Parbhani Banned

महत्त्वाच्या बातम्या

काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

पार्किंगमध्ये कार जास्त वेळ पार्क करताय? तर होऊ शकतं मोठं नुकसान

“शिक्षणाचे माहेरघर पुणे आता ड्रग्ज आणि पबचं होतंय माहेरघर”; या नेत्यानी साधला निशाणा

“गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके..”; संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; 1 जुलैपासून होणार मोठा बदल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .