महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

अंबरनाथ | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेकडर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.

या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पोलिसांना निवेदन दिलं.

दरम्यान, यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर दिलगिरी देखील व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

…तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल- शिवराज सिंह चौहान

 काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या