बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंना ऑफर, म्हणतात…

मुंबई । राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर अनेक नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्यातच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.

‘मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)) उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे’, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. याच वक्तव्याची आठवण करून देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शिंदेंना म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकडे या…आमच्याकडे. तुम्हाला मुख्यमंत्री करायला आम्हाला अडचण येणार नाही. आमच्यातील कोणीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध करणार नाही, अशी जोरदार टोलेबाजी जयंत पाटलांनी केली आहे.

ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी होती, असंही जयंत पाटीलांनी म्हटलं. विधानसभा सभागृहातच जयंत पाटील यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More