Top News

नरेंद्र मोदींच्या हेलिकाॅप्टरची झडती घेणे पडले महागात; अधिकाऱ्याचे निलंबन

भुवनेश्वर | ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकाॅप्टरची एका अधिकाऱ्याने झडती घेतली होती. त्या अधिकाऱ्याला बुधवारी निवडणूक आयोगाने निलंबित केलं आहे.

1996 मधील बॅचचे आयएएस मोहम्मद मोहसिन असं निलंबित झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी मोदींच्या हेलिकाॅप्टरमधील साहित्याची झडती घेतली होती. त्यामुळे नरेंद्र मोदींना ताटकळत थांबावं लागलं होतं.

मोहसिन यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींच्या नियमावलींचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

दरम्यान, मोदींच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान हेलिकाॅप्टरमधून कथित काळा बाॅक्स नेण्यात आल्याचं सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

“नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून फंडिंग”

-“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

-भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला; सुशीलकुमार शिंदेंचे टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या