बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

मुंबई | राज्यात मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. तसेच काही मंत्र्यांवर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोपांच्या फेऱ्यामध्ये अडकलेले दिसत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसूलीचे आरोप आहेत. तसेच अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बदल्यांचं रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या सर्व मंत्र्यांवरील आरोपांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख मागील काही महिन्यांपासून फरार होते. माजी वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर परिवहन मंत्री अनिल परबांचा बदलींचा कारभार आहे, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केल्याचं पहायला मिळत आहे.

पडळकर आपल्या पोस्टमध्ये पुढं म्हणतात की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर बुडवलेला आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाचे टेंडर तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा जावई हा गांजा बहाद्दर आहे. अरे यहा तो सिर्फ घर नहीं, पुरी सरकारही कांच से बनी है, अशी जोरदार टीका पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

दरम्यान, एनसीबीने कारवाई केलेल्या कथित क्रूझ ड्रग्स प्रकरणवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जो कांच कें घर में रहते हैं, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत, असं म्हटलं होतं. त्यावर आता फडणवीस यांच्या समर्थनार्थ पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पाहा पोस्ट –

थोडक्यात बातम्या –

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, “स्पर्धा अजून संपलेली नाही, आता…”

‘तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या…’; राम कदम आक्रमक

‘मला ईडीचा समन्स आला तेव्हा…’; व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More