अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ
मुंबई | हवेत उंच उडायला कोणाला नाही आवडतं प्रत्येकाला आवडतं. पूर्वी हवेत उंचावर जाण्यासाठी फक्त झोपाळे होते पण आता बऱ्याच अशा राइड उपलब्ध झाल्या आहेत. ज्या अगदी गगनचुंबी असतात. त्यामुळे पक्ष्यांसारखं आकाशात उडाल्याचाच जणू आनंद मिळतो. अशाच राइडचा आनंद लुटता लुटता एका व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं, याचा व्हिडीओसध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दोन व्यक्ती रोलर कोस्टर राइडचा आनंद लुटत होते. जमिनीपासून आकाशात उंच जाण्याचा अनुभव घेत होते. त्याचवेळी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक पक्षी येऊन आपटतो. व्हिडीओत दोन्ही तरुण आकाशाच्या अगदी जवळ गेल्यानंतर अति उत्साही दिसत आहेत. तितक्यात एका तरुणाच्या चेहऱ्यावर काहीतरी आपटतं. त्याला काही वेळ कळत नाही की नेमकं काय झालं आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो.
तोंडावर काहीतरी आल्यासारखं वाटतं म्हणून तो तोंडावरून हात फिरवतो. त्यावेळी मानेजवळ काहीतरी असल्यासारखं वाटतं. मानेला हात लावतो तर तिथं चक्क एक पक्षी. हा पक्षी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपटून मानेवर जातो आणि काही वेळ तिथंच बसून राहतो. जेव्हा त्या व्यक्तीचा हात आपल्या मानेजवळ जातो, तेव्हा पक्षी त्याच्या हातातून निसटून भुर्रकन उडून जातो. ही व्यक्ती त्याच्याकडे पाहतच राहते.
दरम्यान, फक्त सात सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण व्हिडिओ पाहताच त्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील विचित्र हावभाव पाहूनच हसू फुटतं. लोक त्याची चांगलीच मजा घेत आहेत.
Bird… pic.twitter.com/Lc8RQCxFSH
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) March 25, 2021
थोडक्यात बातम्या –
पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप
फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी
ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ‘इतके’ वर्ष लागणार- बिल गेट्स
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.