अरे बापरे! बादलीभर ‘बिअर’ काही सेकंदात फस्त, पाहा आश्चर्यचकित करणारा हा व्हीडिओ
मुंबई | जगात अनेक असे लोक आहेत ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं. जेणेकरुन ते नेहमी चर्चेत राहावे. अनेकदा अशा लोकांचं कौतुकही केलं जातं तर कधी खिल्लीही उडवली जाते. इतकंच नाही तर साेशल मीडियावरही त्यांची चर्चा होते. सध्या या यादीत आणखी एक व्हीडिओ जोडला गेला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती अवघ्या काही सेकंदात डोळ्यादेखत बादलीभर बिअर पितो. या आश्चर्यकारक करामतीला पाहणारे लोकही आवाक् झाले आहेत.
या व्यक्तीचं कौशल्य पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण, ज्या पद्धतीने ही व्यक्ती बादलीभर बिअर पित आहे. त्याने सर्वच चकित झाले आहेत. कारण, साधारणपणे लोक आरामात रिलॅक्स होऊन आपल्या एक एक घोट घेत आपली ड्रिंक पितात. मात्र, ती बिअर ही व्यक्ती पाण्याप्रमाणे पितो आहे. ते पण बादलीभरुन बिअर.
बादलीत इतकी बिअर होती की त्याचं संपूर्ण चेहरा बिअरमध्ये बुडालेला होता. या व्यक्तीच्या बिअर पिण्याच्या या अंदाजाला पाहून लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्विटर याचा व्हिडीओ ‘Hold My Beer’ नावाच्या अकांऊटवरुन शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांसाठी बिअर पिण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येत लोकांनी सहभाग घेतला होता. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Drink or Drown competition. Who’s in?🤘🤘 pic.twitter.com/2EQ71ApF9g
— 🍺 Hold My Beer 🍺 (@HldMyBeer) March 14, 2021
थोडक्यात बातम्या –
नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागारांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!
सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!
…अन् 15 कोरोना रूग्णांनी मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली!
झोमॅटो डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल
Comments are closed.