बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असून, सातत्यानं रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनामुळं निवडक नागरिकांच्या उपस्थित विवाहसोहळे पार पडताना दिसत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं लग्न पार पाडले जात आहेत. अशातच एका नवरदेवाला हळद लावण्यासाठी एक अणोखी शक्कल लढवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कोरोना नियमांचं पालन करत सोशल डिस्टन्सिंग बाळगत नवरदेवाचा हळदी समांरभ पार पाडला आहे. नवरदेवाला हळद लावण्यासाठी भिंतीला रंग देण्यासाठी लांब हँडल असणाऱ्या ब्रशचा वापर केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट दिल्या आहेत.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी भीषम सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं की, आपात्कालीन स्थितीमध्येही आपल्या देशात यावरही शक्कल लढवून सगळी योग्य व्यवस्था करणारे लोक आढळतात. कोरोना असला म्हणून काय झालं? हळदीचा कार्यक्रम होणारच आणि तोदेखील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत.

दरम्यान, विवाह सोहळ्यांसाठी अटी घातल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग व कार्यालय सॅनिटाइज करणेही अनिवार्य आहे. कोरोनाच्या काळातही विवाह पार पडत असले तरी प्रत्येकजण काळजी घेताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

कीडाप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ देशात पार पडणार आयपीएलचे उर्वरित सामने

डॉक्टर दाम्पत्याचा दिवसाढवळ्या भररस्यात गोळ्या घालून केला खून, पाहा व्हिडीओ

महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली अन्…; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More