बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘वर्ल्ड आयकाॅन’ एलोन मस्कने एका दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ हजार कोटी

मुंबई | जगातील सर्वांत मुल्यवान वाहन कंपनी असलेल्या टेस्लाचे मालक एलोन मस्क हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या शोधांमूळं चर्चेत असतात. त्यांच्या एका टि्विटने शेअर बाजारात चढ उतार पहायला मिळतात. तसेच जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा समावेश सुद्धा होतो. एलोन मस्क हे सतत जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये असतात.

श्रीमंत लोकांच्या यादीत सतत चढउतार होताना पहायला मिळतं. आता त्यातच, जेफ बेझोस आणि एलोन मस्क एकमेकांना श्रीमंतांच्या यादीत टेकओव्हर करत असतात. पण मागील काही दिवसांपासून एलोन मस्क हे यादीत फार वेगाने वर जाताना दिसत आहेत. ब्लुमबर्ग बिलियनअर्सच्या इंडेक्सनुसार एलोन मस्क हे 209 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

अॅमेझाॅन कॉमर्स कंपनीचे मालक असलेले जेफ बेझोस यांची 198 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. टेस्ला कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.75 टक्क्यांनी वाढले आहेत. याचाच फायदा एलोन मस्क यांना झाला आहे. मस्क यांनी एका दिवसात तब्बल 5.07 अब्ज डॉलर म्हणजेच 37,422 कोटी रूपयांची  कमाई केली आहे. तसेच मस्क यांच्या संपत्तीत वर्षभरात 39.1 अब्ज डॉलरने वृद्धी झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, फ्रेंच व्यवसायिक बर्नार्ड अर्नाल्ट हे श्रीमंत लोकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. तर फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग हे चौथ्या स्थानी आहेत. तसेच जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी हे 11 व्या स्थानावर आहेत, तर अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे 14 व्या स्थानी आहेत.

थोडक्यात बातम्या –

“मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”

“शिवसेना रेसचा घोडा, घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट”

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

” मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाहीच”

“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More