नवी दिल्ली | पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. देशभरात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहेच. परंतु आता पेट्रोलमागे काही राज्यात डिझेलने देखील शंभरीकडे धाव घेतली आहे. यामुळे सामान्य नागरिकामंध्ये सरकारविरोधात रोष वाढताना दिसत आहे.
गेली चार दिवस सलग पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. गेली चार दिवस रोज पेट्रोल-डिझेल 35 पैसे प्रती लीटरने वाढलेलं पाहायला मिळालं. यानंतर भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज मात्र पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. आज हे दर स्थिर आहेत.
आज दिल्लीत पेट्रोलचा दर 105.84 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेल 94.57 रुपये प्रती लीटर आहे. तसेच सध्या मुंबईत पेट्रोल दर 111.77 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेल दर 102.52 रुपये प्रती लीटर आहे.
दरम्यान, देशातील सध्याचे इंधनांचे दर हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत. देशात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलेली होतीच. मात्र आता अनेक राज्यांमध्ये डिझेलही शंभरी पार करु लागलं आहे. त्यातच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीने देखील सामान्य नागरिकांची झोप पळवून लावली आहे.
थोडक्यात बातम्या –
“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”
“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”
कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!
“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…
Comments are closed.