महाराष्ट्र मुंबई

तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई | सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रातच आणि नाणारलाच होईल, त्यासाठी विरोध करणाऱ्यांशी संवादातून मार्ग काढू, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते. 

देशात इंधनाची वार्षिक गरज 20 कोटी टन असून ती दरवर्षी 4.2 टक्क्यांनी वाढत आहे. इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊन इंधनाची आयात कमी करायची असल्यास हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यास तयार आहे. एकदा भेटीसाठी वेळ नाही दिली. त्यात मान-सन्मानाचा प्रश्न नाही. पुन्हा वेळ मागू, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा

-निरंजन डावखरेंच्या विजयामुळे राष्ट्रवादीचं ते स्वप्न अखेर अपूर्ण!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या