Ola च्या ‘या’ जबरदस्त ई-बाईक्स बाजारात घालणार धुमाकूळ

नवी दिल्ली | ओला (Ola) ही जगातील एक उत्कृष्ट ई-बाईक कंपनीपैकी एक मानली जाते. Ola ने ई-बाईकच्या बाजारात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. Ola कंपनी आता बाजारात त्यांच्या काही नवीन ई-बाईक्स लाॅन्च करणार आहेत. याची माहिती कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ट्विट करत दिली आहे.

येत्या 9 फेब्रुवारीला मोठा धमाका करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.’कुर्सी की पेटी बांध लिजि्अे क्योंकी मौसम बिगडने वाला हे’ असं त्यांनी या व्हिडिओत म्हणलं आहे. ओला लवकरच भारतीय बाजारपेठेत 3 इलेक्ट्रिक बाईक्स लाॅन्च करणार आहे. ‘आउट ऑफ द वर्ल्ड’,’ओला परफाॅर्मेक्स’ आणि ‘ओला रेंजर'(Ola Ranger) अशी या बाईक्सची नावं असतील.

आउट ऑफ द वर्ल्ड (Out of the World) ही ओला इलेक्ट्रिक बाईक या तिन्हीपैकी सर्वाधिक प्रिमियम असेल. याची रेंज 100 Kmph पेक्षा जास्त वेग देईल. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत जवळपास 1.50 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर 174 किमी धावेल.

ओला परफाॅर्मेक्स(Ola Performex) तीन प्रकारांसह मध्यम श्रेणीमध्ये लाॅन्च केली जाऊ शकते. एंट्री-लेव्हल व्हेरियंटची रेंज 91 किमी आणि टाॅप स्पीड 93 Kmph असेल. या व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये असू शकते. तिसरी बाईक रेंजरदेखील तीन व्हेरियंटमध्ये लाॅन्च केली जाणार आहे. ही अत्यंत परवडणारी आणि किफायतशीर असणार आहे. याची किंमत 85 हजार असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More