पुणे महाराष्ट्र

जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

पुणे | चलनातून नुकत्याच बंद झालेल्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण शिरुर पोलिसांनी तब्बल १ कोटी २६ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.

८ जून रोजी कवठे येमाई गावाच्या हद्दीत ह्युंदाई क्रमांक MH 12 EU 1194 या गाडीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. या गाडीची तपासणी केली असता या नोटा आढळून आल्या.

पोलिसांनी याप्रकरणी गणेश शिवाजी कोळेकर वय २५ रा.सविंदणे, समाधान बाळू नरे, वय २१ रा. अहमदाबाद, अमोल देवराम दसगुडे वय २५ रा. कर्डीलवाडी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही रक्कम पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. मात्र यानिमित्ताने जुन्या नोटा बदलून मिळत असल्याच्या चर्चा नव्याने सुरु झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप

-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या