बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाच दिवसाच्या बाळासह ओढ्यात अडकली होती ओली बाळंतीन, माऊलींनी वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

बीड | बीड येथील परळी तालुक्यात रात्री मुसळधार पाऊसामुळे ओढ्याला पाणी आलं. यादरम्यान एक जीप पाण्यात अडकून ती वाहू लागली. धक्कादायक बाब म्हणजे या जीपमध्ये एक ओली बाळंतीन असून तिच्यासोबत तिचं पाच दिवसांचं बाळ देखील होतं. मात्र यावेळी एक माऊली देव माणूस बनून आला आणि त्यांनी जे केलं त्यानंर त्यांचं कौतुक करावं तेवढ कमी आहे.

एक बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या रुग्णालयातून बाळंतीण माता आणि पाच दिवसाच्या बाळाला घेऊन बोधेगाव मार्गे कासारी बोडका या गावी जात होती. यावेळी बोधेगाव येथे जोरदार पाऊस होता. यादरम्यान पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ड्राव्हरने गाडी ओढ्यात घातल्यामुळे गाडीत स्टेअरिंगपर्यंत पाणी आलं. लहान बाळाला पोटाशी धरून ओली बाळंतीण गाडीत उभी होती. रात्री कोणीही मदत करण्यासाठी यायला तयार नव्हतं.

ड्रायव्हरने सिरसाळा पोलीस बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचवण्याचं आवाहन केलं. माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतलं. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने चौघांना सुखरूप बाहेर काढलं.

दरम्यान, बाळासह सुखरूप बाहेर निघालेल्या मातेच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माऊलीचे पाय धरले. त्यानंतर चौघांना जीवनदान मिळवून देणाऱ्या माऊलीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

हैराण करणारी बातमी! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा; संभाजीराजेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह

नागपूरकरांना मोठा दिलासा; कोरोना पाठोपाठ काळ्या बुरशीचे रुग्णही घटले

“नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई नाही”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More