बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

T-20 वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात; ‘या’ देशाने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला

मुंबई | आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेची आज धमाकेदार सुरूवात झाली आहे. साखळी गटातील पात्रता फेरीसाठी ओमान संघाने पापुआ न्यू गिनी संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. ओमन संघाने नाणेफेक जिंकत पापुआ न्यू गिनी संघाला प्रथम फंलदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. त्यानंतर ओमन संघाने धारधार गोलंदाजी करत पापुआ न्यू गिनी संघाला 129 धावांवर रोखलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओमन संघाच्या सलामीवीरांनी धडाकेबाज खेळी साकारत विश्वचषक 2021 स्पर्धेमधील  मधील पहिला सामना आपल्या खिशात घातला आहे.

फलंदाजीला आलेल्या पापुआ न्यु गिनी संघाचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. ओमनचा गोलंदाज बिलाल खानने धाराधार गोलंदाजी करत 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या असद वालाने एकहाती किल्ला लढवत 56 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्याला फलंदाज चार्ल्स अमिनने उत्तम साथ देत 37 धावांची खेळी केली. त्यामुळेच पापुआ न्यु गिनी संघाने ओमान संघाला 129 धावांचं लक्ष्य देता आलं.

पापुआ न्यु गिनी संघाचं 129 धावांच लक्ष्य ओमान संघाने 13 षटकांमध्येच पूर्ण केलं. ओमन संघाचा सलामीवीर फलंदाज जतिंदर सिंगने 42 चेंडूत 73 धावांची विजयी खेळी केली. या खेळीमध्ये 7 खणखणीत चौकार तर 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. तर आकिब अय्यासने त्याला उत्तम साथ देत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत अर्धशतकी खेळी साकारली.

दरम्यान, साखळी गटातील पात्रता फेरीसाठी दुसरा सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडमध्ये सुरू आहे. नाणेफेक जिकंत बांग्लादेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याआधी बांग्लादेश संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या तगड्या संघाला टी-20 सामन्यामध्ये पाणी पाजलं आहे. त्यामुळे आज होत असलेल्या स्कॉटलंड विरूद्ध बांग्लादेश या सामन्याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

रक्षकच ठरला भक्षक! वडिलाने केला अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More