बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्राॅनबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा; ‘या’ महिन्यात रूग्ण झपाट्याने वाढणार

मुंबई | कोरोना या एकाच नावाभोवती आपलं आयुष्य गेली दीड वर्ष झालं फिरत आहे. कोरोना महामारीनं अवघ्या जगासमोर अनेक प्रकारची संकटं उभी केली आहेत. अशातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. परिणामी सरकारसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा ओमिक्राॅनचा रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर जगभरात या प्रकारच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. आपल्या देशात सध्या ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतं आहे. देशाच्या तुलनेत राज्यातील रूग्णसंख्या ही अधिक असल्याचं पहायला मिळत आहे. परिणामी ठाकरे सरकारसमोरील संकटं वाढलं आहे.

देशात सध्या 70 पेक्षा अधिक ओमिक्राॅनचे रूग्ण आहेत. या प्रमाणात जर रूग्णसंख्या वाढत राहिली तर राज्यात जानेवारी महिन्यामध्ये गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिणामी राज्यात अनेक क्षेत्रात निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, देशाच्या तुलनेत राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. परिणामी आता ओमिक्राॅनबाबत असं होवू नये म्हणून सरकार काळजी घेत आहे. महाराष्ट्रात तब्बल 30 पेक्षा अधिक रूग्ण आहेत. परिणामी सरकार आपली तयारी करण्यात गुंतलं आहे.

थोडक्यात बातम्या 

रोहित पाटलांच्या बघून घेतोच्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

देशभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणात मोठा ट्विस्ट; इंद्राणी मुखर्जीनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या विराटला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More