बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणीबाणी जाहीर! ‘या’ शहरात कोरोनाने माजवला हाहाकार

न्यूयाॅर्क | कोरोनाने (Corona) गेल्या दोन वर्षापासून जगभर हाहाकार माजवला आहे. भारतात देखील कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली. आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटने म्हणजेच ओमिक्राॅनने (Omicran) जगभर थैमान घातल्याचं दिसतंय. (Disaster emergency has been declared in New York)

ओमिक्राॅनमुळे आता अमेरिकेची चिंता वाढली आहे. हा नवा व्हेरियंट आता हाताबाहेर गेलेला दिसत आहे. त्यामुळे आता लसीकरणानंतर देखील अनेक रूग्ण दगवाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वच रूग्णालयात बेड्स देखील फुल्ल झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता न्यूयाॅर्कमध्ये आपत्ती आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे न्यूयाॅर्कच्या गव्हर्नरने आपत्ती आणीबाणीची घोषणा केली आहे. ‘न्यूयॉर्क राज्यातील आपत्ती आणीबाणी’, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपुर्ण अमेरिकेत पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती न्यूयाॅर्कमध्ये सामान्य होती. मात्र, आता पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत आहे. गेल्या 24 तासात न्यूयाॅर्कमध्ये 5785 नवे रूग्ण आढळले आहेत. अशातच आता भारतात देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय.

थोेडक्यात बातम्या-

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने राज्यात खळबळ; बीएमसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! अहमदनगर येथे एसटी बसेसवर दगडफेक

“सरकार पडणार असं बोललं जात आहे, पण चाललंय ना बाबा सरकार”

“…यासाठी सत्ताधारी सेनेला किती दंड आकारायचा?”

“नवाब मलिकांचा त्यांचाच गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का?”

‘… या बाबतीत आम्ही मोदींचे शिष्य’; नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More