बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत; यंत्रणांना दिले सज्ज राहण्याचे आदेश!

मुंबई | कोरोना रूग्णसंख्या कमी होत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटने (New Corona Variant) म्हणजेच ओमिक्राॅनने (Omicran) जगभरातील अनेक देशांमध्ये दहशत माजवली आहे. अशातच भारतात देखील आता केंद्र आणि राज्य सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय.

कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत होते. त्यामुळे ओमिक्राॅन व्हेरियंटचा विषाणूचा महाराष्ट्रात फैलान होऊ नये, यासाठी आता राज्य सरकारने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यंत्रणेला सुचना दिल्या आहेत.

आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई महानगरप्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड सेंटर इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन तसेच विद्युत ऑडिटला या सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोरोना आता नियंत्रणात आल्यामुळे आता सर्व आरोग्य यंत्रणा निर्धास्त झाल्या होत्या. तर सामान्य लोक देखील कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

…अन् राज्यपाल म्हणाले,”मी आजच्या आज राजीनामा देतो”

‘बिग बुल’ झुनझुनवालांना जोर का झटका! झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More