बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतात दररोज Omicron चे 1.8 लाख रूग्ण आढळतील’; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

नवी दिल्ली | कोरोनाच्या (Corona) रूग्णसंख्येत कमी झाल्यानं अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा व्हायला लगाली होती. पण अचानक आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅन (Omicron) आला आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. परिणामी आपल्या देशातदेखील रूग्णसंख्या वाढणार यावर तज्ज्ञांनी (Experts) एक गंभीर इशारा दिला आहे.

भारतात आतापर्यंत 230 च्या आसपास ओमिक्राॅनची प्रकरणं आढळली आहेत. परिणामी केद्र सरकारनं सर्व राज्यांना गंभीर इशारा दिला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकार काही गोष्टींवर निर्बंध लावण्याची शक्यता आहे. ओमिक्राॅनची वाढती प्रकरणं पहाता देशात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रीय कोविड-19 सुपर माॅडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रकरणाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला देशात तीसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या प्रमाणात कमी परिणामकारक असणार आहे. पण तीसरी लाट नक्की येणार असं, विद्यासागर यांनी म्हटलं आहे. परिणामी ओमिक्राॅनचा धोका वाढलाय हे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनची प्रकरण वाढली तरी लसीकरणामुळं नागरिकांमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारकशक्ती या आव्हानाला नक्कीच तोंड देईल, असंही विद्यासागर म्हणाले आहेत. सध्या जगभर ओमिक्राॅनची प्रकरण झपाट्यानं वाढत आहेत.

थोडक्यात बातम्या 

पत्रकार परिषद घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या…

नितेश राणेंना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी चौकशी होणार

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More