बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron | परदेशातून आलेले ‘ते’ 38 प्रवासी बेपत्ता, राज्याची धाकधूक वाढली

औरंगाबाद | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या Omicron व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा देशात शिरकाव झाल्याने धाकधुक वाढली असताना महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे.

परदेशातून औरंगाबादमध्ये (Aurangabad) आलेले 38 प्रवासी बेपत्ता असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी (Corona Test) बंधनकारक असून त्यांच्यावर लक्ष देखील ठेवण्यात येत आहे.

1 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत औरंगाबादमध्ये 584 प्रवासी आले आहे. या प्रवाशांमधील तब्बल 38 जणांचा अजूनही पत्ता नाही. या 38 मधील 30 जण बाहेरगावी असून बाकी प्रवासी बेपत्ता आहेत. महापालिकेने 35 जणांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात परदेशातून औरंगाबाद येथे आलेले रूग्ण बेपत्ता असल्याने संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदींनी डुबकी मारलेल्या त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहत होती”

लग्नानंतर विकी-कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर, विककॅटच्या लूकनं वेधलं लक्ष

अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे अडकली लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

राज्यात Omicron चा धोका वाढला; ‘या’ ठिकाणी सापडले आणखी 8 रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More