बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

मुंबई | राज्यासह आता संपुर्ण देशभारात आता Omicron रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतीये. अशातच आता मुंबईच्या धारावीमध्ये Omicron चा रूग्ण आढल्याने आता मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात Omicron रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 11 आणि 12 डिसेंबर रोजी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली किंवा मोर्चांना मनाई करण्यात आली आहे. Omicron संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटेच्या वेळीस धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत कोरोना रूग्णसंख्या नियंत्रित राहण्यास सुरूवात झाली होती. अशातच आता झपाट्याने वाढणाऱ्या या ओमिक्राॅनमुळे आता मुंबईच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

दरम्यान, या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने देखील बघितलं जातंय. मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमने (AIMIM) औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका देखील होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला होणार सामना

“दादा बघा, दादा बघा…अरे दादाला इथली अंडी पिल्लं माहितीये”, अजित पवारांची टोलेबाजी

“साथियो, सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है”, मलिकांच्या ट्विटने खळबळ

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More