बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टेंशन वाढलं! Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू, खुद्द पंतप्रधानांनी केला खुलासा

लंडन | कोरोनामुळे (Corona) अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. अशातच आता कोरोनाच्या नवा व्हेरियंट Omicron ने जगाची चिंता वाढवली आहे. Omicron व्हेरियंट झपाट्याने प्रसार करत असल्याने आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. अशातच Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. (Omicron causes death of a patient)

Omicron मुळे इंग्लंडमधील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता जगभरात चिंताजनक परिस्थिती असल्याचं दिसतंय. इंग्लंडमध्ये सोमवारी Omicron मुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी दिली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये आरोग्य यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी आणि आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. Omicron व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्यानं केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, Omicron मुळे आता काही राज्यात लाॅकडाऊन लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी याबाबत इशारा देखील दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

अंकिता लोखंडेला आली सुशांतसिंह राजपूतची आठवण; साखरपुड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

“मॅचपूर्वी SEX करा”, सचिन-द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता सल्ला

“देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते तेव्हा…”, नवाब मलिकांचा खोचक टोला

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More