बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

मुंबई | सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. क्रिप्टोकरन्सीने (Cryptocurrency) अनेकांना काही तासातच लाखोंच्या पटीने परतावा दिला आहे. मागील काही दिवसांमध्ये बाजारात आलेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे अनेक गुंतवणुकदार मालामाल देखील झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे (New Corona Omicron variant) वेगळाच गोंधळ पहायला मिळत आहे. (Omicron Cryptocurrency)

दक्षिण अफ्रिकेमध्ये (South Africa) सर्वप्रथम आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला ओमिक्राॅन हे नाव देण्यात आलं होतं. जगभरात वेगाने पसरणाऱ्या B.1.1.529 या स्टेनला हे नाव देण्यात आलं आहे. अशातच आता ओमिक्राॅन या व्हेरिएंटमुळे Omicron या Cryptocurrency ला मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.

कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे शेअर बाजारला तसेच क्रिप्टोकरन्सीला मोठा फटका बसला आहे. तसेच Bitcoin आणि Ethereum दोन्हीं क्रिप्टोकरन्सीच्या किंमती घसरल्या आहेत. अशातच ओमिक्राॅन क्रिप्टोमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. इथरियमवर आधारित क्रिप्टोकरन्सी टोकनची किंमत 945 टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरूवातीला हे टोकन सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फक्त दोन दिवसांत या टोकनची किंमत 65 डाॅलरवर होती. त्यानंतर आता केवळ दोन दिवसात एका ओमिक्राॅन क्रिप्टोकरन्सीची किंमत आता 689 डाॅलर (Dollar) म्हणजेच 51,675 रूपयांवर पोहोचली आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजप आता राज्यात 1 नंबरचा पक्ष बनलाय”

‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष…’, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

‘शेतकऱ्यांच्या झाडांना प्रत्येकी 20 रुपये एवढी प्रचंड मदत केली’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More