बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टेंशन वाढलं! नवी दिल्लीत Omicron चा पहिला रुग्ण सापडला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या ओमिक्रॉन विषाणूने (omicron) जगाची चिंता वाढवली आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये तीसपेक्षा जास्त म्युटेशन्स झाले त्यातून निर्माण झालेला ओमिक्रॉन विषाणू डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta Variant) पाचपट अधिक घातक आहे. त्यातच ओमिक्रॉनचे रूग्ण सापडत असल्याने देशात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. (The first patient of Omicron was found in New Delhi )

टांझानियाहुन(Tanzania) दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीची चिंता वाढली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन(Delhi Health Minister Satyendra Jain) यांनी दिलेल्या माहितीनुसार टांझानियाहून आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने जिनोम सिक्वेसिंगकरिता पाठवण्यात आला होता.

संबंधित अहवाल आला असून पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या बाधित रूग्णावर दिल्लीमधील एलएनजेपी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच देशात ओमिक्रॉन रूग्ण आढळल्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. सतर्क राहावं लागेल आणि कोरोनाविषयक नियमांच पालन करावं लागेल, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.(The Director General of ICMR, Dr. Balram Bhargava)

दरम्यान, भारतात आता ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या पाचपर्यंत गेली आहे. भारतात कर्नाटकमध्ये(Karnataka) सर्वात प्रथम ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळलेले होते. त्यानंतर गुजरातमध्ये(Gujarat) एक  आणि महाराष्ट्रात डोंबिवलीमधील(Dombivali, Maharashtra) एका व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता टांझानियाहुन प्रवास करून आलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात हलक्या पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे”

Share Market: लाखाचे केले 66 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

दिलासादायक बातमी! Omicron बाबत आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

“…तर राज्यात लाॅकडाऊन लावावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More