बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लोकांसाठी Omicron घातक, WHo नं दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या नवनीन व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. कोरोनाच्या (Corona) ओमिक्राॅन (Omicron) या व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच देशात दाखल झालेल्या ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.

ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी ओमिक्राॅन व्हेरियंट अतिशय घातक आहे. हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरीही त्या लोकांसाठी ओमिक्रॉन धोकादायक ठरू शकतो, असं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

ओमिक्राॅनला हलक्यात घेऊ नका. लोकांमधील भीती कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण लसीकरण हेदेखील आहे. लसीकरणामुळे या व्हेरियंटपासून सुरक्षा मिळत असल्याने लोक याला कमी घातक समजत आहेत, असं भारतातील निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधही कडक करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत

भाजपचे ‘इतके’ आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांच्या दाव्याने खळबळ

सावधान! ओमीक्रॉन रुग्णांमध्ये आढळतंय ‘हे’ प्रमुख लक्षण, लस घेतल्यांनाही होते लागण

मोठी बातमी! पुण्याजवळच्या ‘या’ सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी

निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More