बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्त धोका

मुंबई | जगाची चिंता वाढवणारा ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट (new Corona varient Omicron) आढळल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकाकडून राज्यांना निर्देश देण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने देखील खबरदारीचा इशारा (The World Health Organization also issued a warning) दिला आहे. अशातच आता ओमिक्रॉनच्या धोक्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या या नविन ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान वाढताना जाणवतं. आरटीपीसीआर चाचणीवरून देखील या व्हेरिएंटला ओळखलं जाऊ शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीला कोरोनाच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. त्या व्यक्तीला नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका जास्त असल्याचं देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. अशा व्यक्तींना सहजतेने संसर्ग होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे अफ्रिका आणि युरोपीय देशात खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्याने आता न्यूयाॅर्कमध्ये आणीबाणी देखील लागू करण्यात आली आहे. तर भारतात देखील आता केंद्र सरकार आता अॅक्शन मोडवर दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना अलर्ट जारी

कॅप्टनने 8 फिल्डर लावले अन् जडेजाने टाकला ‘तो’ थ्रिलर बाॅल पण…

नागपूर नाही मुंबईच!, “मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन मुंबईतच होणार”

मोठी बातमी! हिवाळी अधिवेशनात ‘या’ 12 खासदारांचं निलंबन, 2 शिवसेनेचे

नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोणती?; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More