बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेळीच ओळखा Omicron; ‘ही’ लक्षणं असतील तर लगेच टेस्ट करा!

मुंबई | जगभरात सध्या कोरोनाचा (Corona) नवा व्हेरियंट ओमिक्राॅन (Omicron) धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाश्चिमात्य देशात हजारोंच्या संख्येत ओमिक्राॅनबाधित रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता काही शहरांमध्ये लाॅकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ आली आहे. अशातच आता ओमिक्राॅनची नवनवीन गंंभीर लक्षणं दिसत आहेत. (Omicron new serious symptoms) त्यामुळे आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलंय.

कोरोना झाल्यास सर्दी सारखी लक्षणं आढळतात. मात्र, ओमिक्राॅन व्हेरियंट असल्यास श्वास घेताना फूरफूर आवाज येतो. तसेच डोकेदुखी आणि थकवा देखील जाणवतो, असं युकेच्या अभ्यासातून समोर आलं आहे. ही लक्षण आढळल्यास ओमिक्राॅन व्हेरिंयटची लागण झाल्याची शक्यता आहे. ओमिक्राॅनचा संसर्ग टाळता यावा यासाठी आता लसीकरणावर भर दिला जातोय.

झो कोविड स्डटी अॅपने ओमिक्राॅनवर अभ्यात्मक संशोधन केलं होतं. या अभ्यासात नाक वाहने, डोकेदुखी, थकवा येणे, शिंका येणे त्याचबरोबर घसा खवखवणे यासारखी लक्षणं दिसून आली आहेत. सुपर म्यूटंट व्हेरियंट हा कोविडच्या सर्दीसारखा आहे. ताप, खोकला किंवा वास कमी होणे यासारखी क्लासिक कोविड लक्षणं मानली जातात.

दरम्यान, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या जल्लोषात कोरोना नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे. ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आता तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अश्लील व्हिडीओप्रकरणी अखेर राज कुंद्रानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

“2014 ला शिवसेनेला दूर करा असं भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते?”

धक्कादायक! अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीचा समन्स, ‘या’ प्रकरणात नाव आलं समोर

“2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…”रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘बाजारू अमोल मिटकरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर…’; राम सातपुतेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More