बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेतलेल्या ‘इतक्या’ भारतीयांना Omicronचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनानं (Corona) गेल्या दोन वर्षापासून मृत्यूचा तांडवच लावला आहे. या काळात कोरोनानं लाखो लोकांचे बळी घेतले. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं चिंतेत आणखी भर पाडली आहे. लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लसीकरणाविषयी संशोधनातून एक महत्त्वाची बाब समोर येत आली आहे. प्राथमिक संशोधनाच्या आधारे हे सांगण्यात आलं आहे की, भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील ओमिक्राॅन (Omicron) च्या संसर्गाचा धोका आहे.

फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल. मात्र या दोन्ही लस काही देशांमध्ये उपलब्ध नाहीत.

दरम्यान, कोरोना लसीकरण (Vaccination) करणं अनिवार्य केल्यामुळे प्रत्येक नागरिकांना लस घेणं सक्तीचं केलं आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारीही बरीच मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. ज्या ठिकाणी सोई-सुविधा नाही त्या ठिकणीही लस पोहचवण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इथे एकमेकांना…’; प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर घणाघात

‘…अन् तुम्ही माझी औकात काढताय, ‘तो’ पराभव विसरलात का?’; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

“शरद पवार यांना सोडून जाणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवा”

जितेंद्र आव्हाडांच्या कन्येचं दुसऱ्यांदा लग्न, पाहा लग्नाचा शानदार व्हिडीओ

धक्कादायक! Omicronच्या धास्तीनं ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More