बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron: विनामास्क वाहन चालवणं महागात पडणार; होणार ‘ही’ मोठी कारवाई

औरंगाबाद | कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा 14 राज्यात प्रसार झाल्याने देशाची चिंता वाढली आहे. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधीत रूग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बघता औरंगाबाद महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे.

औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेच्या निर्णयामुळे विनामास्क गाडी चालवणं आता महागात पडू शकतं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलली जात आहेत.

महापालिका आता विनामास्क वाहन चालवणाऱ्या चालकांचे त्यांच्या वाहनासहित फोटो काढून थेट आरटीओ (RTO) कार्यालयात पाठवणार आहे. त्यानंतर या चालकांवर आरटीओ दंडात्मक कारवाई करणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत औरंगाबादमध्ये अशा 90 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास नको म्हणून प्रशासन लागलं कामाला, केली ‘ही’ जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशनापूर्वी नाना पटोले थेट दिल्लीत, राजकीय हालचालींना वेग

गुंतवणुकदारांना दिलासा; LIC IPO बाबत मोदी सरकारकडून महत्वाची अपडेट

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

MPSC Exam: इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; राज्य सरकारमध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी मेगाभरती सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More