बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron | ‘….तर पुन्हा कडक निर्बंध लागू करू’; ‘या’ दहा राज्यांना केंद्राचा इशारा

नवी दिल्ली | देशात सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron variant) रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच चिंतेची बाब देशात कोरोना रूग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोना संक्रमणाचा दर वाढत असल्यामुळे  केंद्र सरकारकडून 10 राज्यांना पत्र जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी पत्राद्वारे काही निर्देश दिले आहेत.

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढत आहे. तिथे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक पाऊल उचण्याची गरज असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता आवश्यक असल्यास नाईट कर्फ्यु, गर्दीवर नियंत्रण आणि लग्न समारंभावर बंदी लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मिझोरोम, केरळ तसेच सिक्किमच्या आठ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर वाढत आहे. तसेच केंद्र शासित प्रदेशातील 27 जिल्हे असे आहेत की, गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वाधिक कोरोना रूग्ण नोंदवल्यामुळे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी आणि आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्याने केंद्र सरकारकडून सावधानता बाळगण्यात येत आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे तिथे कडक पाऊल उचलण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

“मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्यात येणार”

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर…- संजय राऊत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More