बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्राॅनची धास्ती! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार?

मुंबई | कोरोना रुग्णसंख्या (Corona) आटोक्यात आली असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Varient) जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर आता अनेक उपाययोजना करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीमध्ये नव्या कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी काही निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आता डेल्टा विषाणू (Delta Varient) नंतर ओमिक्राॅन हा विषाणू डोकं वर काढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज चाईल्ड फोर्सशी (Child Force) चर्चा करणार असून शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचं बोललं जात आहे. 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला होता. परंतु आता नवा विषाणू डोकं वर काढत असल्याने शाळा संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात आणखी काही निर्बंध (Restrictions) पुन्हा एकदा लागू होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या

“दोन वर्षात न चुकता भ्रष्टाचार करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे”

द.आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या ‘त्या’ कोरोना रूग्णाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

‘लॉकडाऊन नको असेल तर…’, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More