बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | omicron व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला थोपवून लावण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता मुंबई महापालिकेने (BMC) महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे मुंबई महापालिकेने अँटीजन चाचण्यांचे 20 लाख कीट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ अर्ध्या तासातच चाचणीचा अहवाल प्राप्त होणार आहे.

कोरोनाच्या एका चाचणीसाठी  आता फक्त 9 रूपये मोजावे लागणार आहेत. अँटीजन चाचणी (Corona Antigen Test) संबंधिचा हा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समीतीच्या पटलावर मंजूरीसाठी येणार आहे.

दरम्यान, देशात सध्या 21 ओमिक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी हा व्हेरिएंट कमी घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना चाचणीवर भर देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

‘आता तरी तुमच्या घरातील ‘तो’ आवाज बंद होईल’; अनुष्का शर्माच्या हटके शुभेच्छा

चहलच्या बायकोने केली धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची COPY अन्…; पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? ‘या’ तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More