बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन्स झाल्याने ओमिक्रॉन हा नविन व्हेरिएंट (Omicron variant) तयार झालेला आहे. ओमिक्रॉन विषाणू  डेल्टा व्हेरिएंटपेक्षा(Delta variant) अधिक धोकादायक असल्याने जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेत(South Africa)ज्या भागात ओमिक्रॉन  विषाणू केस समोर आली होती त्याठिकाणी 30 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

गाँटेंग प्रांतातील दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्स बर्गचाही (The capital is Johannesburg)समावेश असल्याची माहिती आहे. त्यानंतर दक्षिण भागातही कोरोनाचा उद्रेक झाला होता. गाँटेंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात नव्याने रूग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या 580 वर पोहोचली आहे. गाँटेंग भागातच दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्गचा समावेश होतो.

जोहान्सबर्ग प्रांतात केवळ 40 टक्के नागरिकांच लसीकरण झालेलं आहे. त्यातही नागरिकांना लसीचा केवळ एकच डोस देण्यात आला आहे. डॉ. उबवेन(Dr. Ubwen) यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 10 दिवसांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेतील नव्या रूग्णसंख्येपैकी तब्बल 81 टक्के प्रकरण गाँटेंगभागात आढळून आले आहेत.

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं(WHO) देखील चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा सहा पट अधिक बलशाली म्हणजेच संसर्गजन्य आहे. त्यामुळे सर्वाधिक संक्रमण होण्याचा धोका आहे. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशन्समुळे रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

चुकीला माफी नाही! KL Rahul आणि Rashid Khan यांंच्यावर 1 वर्ष बंदीची शक्यता

गृहिणींसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More