बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘Omicronचं संकट वाढलंय, सावधान रहे सतर्क रहे’; मोदींचा देशवासीयांनी सल्ला

नवी दिल्ली | कोरोना रुग्णसंख्या (Corona) आटोक्यात आली असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Varient) जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर आता अनेक उपाययोजना करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काळात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता आज पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी देशाला संबोधित केलं आहे. ओमिक्राॅनला घाबरुन जाण्याची काही गरज नाही, फक्त काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं.

पुढे त्यांनी लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली. 16 जानेवारी पासून लसीकरण सुरू केलं होतं. आतापर्यंत 141 कोटी लोकांचं लसीकरण झाला आहे. त्यामुळे देशानं लसीकरणाचा चांगला टप्पा पार केला आहे.

दरम्यान, 18 लाख आयसोलेशन बेड सध्या भारतात असल्याचंही मोदींनी सांगतिलं आहे. याशिवाय वर्ष संपत आलंय तोच नवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. मात्र घाबरुन न जाता नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं मोदींनी देशाला संबोधताना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! ‘या’ वयाच्या लहान मुलांना मिळणार कोरोना लस

नितीन राऊतांना मोठा झटका! काॅंग्रेसनं ‘या’ पदावरुन हटवलं

‘लसीचे डोस घ्या, नाहीतर कारवाई करु’; महापालिकेचा गंभीर इशारा

“दहा मिनीटं रडायचं आणि जाताना पप्प्या घ्यायच्या, हे नेहमीचंच झालंय “

“…पण अजित पवारांनी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असं धुडकावल्यासारखं सांगू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More