उस्मानाबाद | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
हल्लेखोराने चाकू पोटात खुपसण्यासाठी उगारला मात्र ओमराजेंनी हातावर वार झेलल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे. खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्याशी हात मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी यांच्या जवळ आला. जवळ येताच त्याने एक हात हातात मिळवला आणि दुसऱ्या हाताने ओमराजेंवर चाकूने हल्ला केला. ओमराजेंनी आपला बचाव करत वार हातावर झेलले. या घटनेत त्यांना किरकोळ जखम झाली आहे.
ओमराजे निंबाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सुखरुप आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपी हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
… तर तुम्हाला अगदी फुकट मिळू शकते साडे तीन लाख हिऱ्यांनी सजलेली कार! https://t.co/zs9DPmLyrJ @laxmidiamond
— थोडक्यात (@thodkyaat) October 16, 2019
राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणतात…- https://t.co/ij3AlK7igj #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 16, 2019
Comments are closed.