ओमराजे निंबाळकरांचं डोंगराएवढं लीड… अर्चना पाटील यांचा पराभव अटळ?

Omraje vs Archana Patil

Omraje Nimbalkar Vs Archana Patil | धाराशिव मतदारसंघातून एक मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा धाराशिव बालेकिल्ला आहे. सध्या ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar Vs Archana Patil) हे मोठ्या फरकाने विजयाकडे वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील असून त्या पिछाडीवर दिसत आहेत.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर आता अनेकांचं लक्ष हे धाराशिव मतदारसंघाकडे लागलं आहे. हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी महायुतीने अनेक प्रयत्न केले. सभा, प्रचार रॅल्या काढल्या होत्या. मात्र आता त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ओमराजे यांनी खासदार होणार आणि दिल्लीत जाणार असल्याचा विश्वास मनाशी पक्क ठेवला होता. (Omraje Nimbalkar Vs Archana Patil)

ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाखांचा टप्पा ओलांडला

धाराशिव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख मतांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती समोर आली. चौथ्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांना 1 लाख 3 हजार मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये 44 हजार मतांचा फरक पडला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अर्चना पाटील यांना मोठा धक्का बसला असून वन वे लढई पाहायला मिळाली आहे. (Omraje Nimbalkar Vs Archana Patil)

मतांचा टक्का ओमराजेंच्या पथ्यावर

2019 ला ओमराजे 1 लाख 27 हजार मतांनी निवडून आले होते. यंदाच्या वर्षी ओमराजे आपलाच रेकॉर्डब्रेक करतील का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. धाराशिव येथे 63.88 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं. यामुळे मतांचा टक्का हा ओमराजे निंबाळकर यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. (Omraje Nimbalkar Vs Archana Patil)

News Title – Omraje Nimbalkar Vs Archana Patil Fight At Dharashiv Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर

साताऱ्यात शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले; कोण आघाडीवर? जाणून घ्या अपडेट

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं निकालाबाबत मोठं भाकीत!

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; ‘या’ जागांवर महाविकास आघाडी सुसाट

अहमदनगर लोकसभेची गणित फिरली; आकडेवारीत झाला मोठा फेरबदल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .