बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव

नवी दिल्ली |  2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला आहे. शिवाय नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असं भाकितही रामदेव बाबांनी केलं आहे.

माझ्या भविष्यवाणीनं 23 मे रोजी देशातील काही राजकारण्यांचं स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल, असंही रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

मोदींच्या रूपाने देशाला मजबूत आणि स्थिर सरकार मिळेल, असंही बामदेव बाबा म्हणाले आहेत.

कमल हसन चांगले अभिनेते आहेत पण चांगले नेते होऊ शकत नाही. तर पश्चिम बंगालमध्ये रोड शो दरम्यान झालेली हिंसा म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, असं टीकास्त्र त्यांनी ममतांवर सोडले.

महत्वाच्या बातम्या

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस

-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा

-…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

-कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

-‘द वायर’ला राहुल गांधींची खास मुलाखत… काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल?? राहुल म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More