बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे तालिबान्यांची तंतरली, तब्बल 100 हून अधिकजण मृत्यूमुखी!

काबूल |  तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्याठिकाणी आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील कुंदुज प्रांतात नमाज करताना एका मशिदीवर बॉम्बस्फोट झाला. त्या स्फोटामध्ये जवळपास 100 नागरिक मरण पावले आहेत. शिया मुस्लिमांना लक्ष्यस्थानी ठेऊन हा हल्ला केला असल्याचं अफगाणिस्तानचे मंत्री जबीउल्लाह मुजाहिदी यांनी दिली आहे.

शुक्रवारी प्रार्थनासभेत हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून या हल्ल्याचा अधिक तपास अधिकारी करत आहेत. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही, मात्र इसिस ही संघटना अनेक दिवसांपासून शिया मुस्लिमांना लक्ष्यस्थानी ठेऊन हल्ला करत असल्याचं मुजाहिदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यु झाला आहे. मागील आठवड्यात काबूल विमानातळावर झालेल्या हल्ल्यात 8 नागरिक मृत्यू झाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राला आणखी एका चक्रीवादळाचा धोका! ‘या’ जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

“राज्यातून कर गोळा करता मग त्यांचा वाटा का देत नाही?”

मुंबईत डीसीपी सुजाता पाटील यांना अटक; एसीबीने सापळा रचून पकडलं

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार ‘पत्रकार मारिया रेसा’ आणि ‘दिमित्री मुरातोव्ह’ यांना जाहीर!

“यांची काय औकात, तिकडं त्यांना कोण विचारतंय, उद्या सगळ्यांचा भांडाफोड करणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More