बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | आगामी वर्षात अनेक राज्यात विधानसभासाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्ष या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे.  काॅंग्रेस पक्ष आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी तरूणांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. कम्युनिस्ट नेता आणि जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी हे दोन्ही नेते काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

कन्हैया कुमारने यापूर्वी भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त 28 सप्टेंबर रोजी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली होती. परंतु ती तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही नेते 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी प्रवेश करणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी याआधी काॅंग्रसेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दोनवेळा भेट घेतली आहे. त्यावेळी प्रंशात किशोर देखील या बैठकीला उपस्थित होते.

कन्हैया कुमारने बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणुक लढवली होती. त्यावेळी कन्हैया कुमारने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांना कडवी टक्कर दिली होती. कन्हैया कुमारसोबत काॅंग्रेसला जिग्नेश मेवानीच्या रूपात गुजरातमध्ये तडपदार चेहरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात गेल्या काही दिवसात गुप्त बैठका झाल्या आहेत. त्यावेळी कन्हैया कुमार काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं काॅंग्रेसमधील बड्या नेत्यांनाही माहित नव्हतं.  दोघांच्या प्रवेशामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या कानशिलात दोन हाणाव्यात”

सोमय्यांच्या अडचणी वाढल्या??, 72 तासांनंतरही माफी न मागितल्याने परबांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

“शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, त्यांना पक्षातून काढण्यात आलं”

“अनंत गीते काही चुकीचं बोलले नाहीत, ही आघाडी…”; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

‘…तर लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो’; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More