बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून वाढदिवसादिवशी महानायकाने घेतला ‘या’ जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय

मुंबई | बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर सिनेजगतावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणून बच्चन यांना अवघं जग ओळखतं. बच्चन यांच्या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. बच्चन यांनी अनेक व्यावसायिक जाहिरातीत काम केलं आहे. पण आज अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसादिवशी चक्क एका जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमिताभ बच्चन यांना लोक प्रेरणास्थान मानतात. अमिताभ यांच्या प्रत्येक कृतीचं अनुकरण करण्याचा त्यांच्या चाहत्यांचा प्रयत्न असतो. आता अमिताभ यांनी कमला पसंद या पान मसाल्याची जाहीरात न करण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ यांनी पान मसाला कंपनीच्या प्रत्येक कामापासून स्वत:ला वेगळं करण्याचा निर्णय आज घोषित केला आहे.

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळं अमिताभ यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं. युवकांना या पान मसाल्याचं व्यसन लागू नये, म्हणून आपण ही जाहिरात सोडत असल्याचं अमिताभ यांनी घोषित केलं आहे. सध्या अमिताभ बच्चन हे अनेक संघटना आणि भारत सरकारच्या जनहिताच्या योजनांचे ब्रॅंड अॅम्बेसिडर आहेत. बच्चन यांच्या या निर्णयाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, आज बच्चन यांचा 79 वा वाढदिवस आहे. पानमसाल्याच्या जाहिरातीतून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळं पुन्हा एकदा बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डाॅ शेखर साल्कर यांनी बच्चन यांना या पान मसाल्याच्या जाहिरातीतून बाहेर पडण्यासाठी पत्र लिहिल होत. चाहत्यांच्या विनंतीला आणि साल्कर यांच्या पत्राला महानायक बच्चन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

थोडक्यात बातम्या

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ म्हणजे सरकारचा पुरस्कृत दहशतवाद”

“माझा मुलगा 11 वर्षांचा असताना अचानक गेला, त्यावेळी फक्त शाहरूख खान…”

लग्नासाठी धर्मांतर करणारे हिंदू लोक हे…- मोहन भागवत

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More