Top News कोल्हापूर महाराष्ट्र

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन'”

कोल्हापूर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी राज्य सरकारने शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून रोजी राज्यभरात ‘शिव स्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

राज्यातील 30 हजार ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा प्रशासनाची सर्व प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी यादिवशी गुढी उभारली जाणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गुढीसमोर सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण करावे, महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत, शिवरायांचे विचार मांडावेत. या दिवशी शासकीय सुट्टी आली तरी हा दिवस साजरा करणे बंधनकारक असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या स्थानिक स्वराज्य संस्थांत सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुढी उभारायची आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! DSP लेकीला आपल्या बापाचा कडक सॅल्यूट

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी”

राजकारणात प्रवेश करणार का?, सोनू सूद म्हणाला…

अखिलेश यादव यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका, म्हणाले…

कंगणा-उर्मिलाच्या वादात रोहित पवारांची उडी; ‘महाराष्ट्रद्रोही भाजपचा….’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या