बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नावात काय आहे’ म्हणणाऱ्यांना झटका, ‘हे’ नाव असेल तर 501 रुपयांचं पेट्रोल फुकट मिळणार!

भरूच | सध्या भारतीय मनावर अधिराज्य गाजवत असलेलं नाव म्हणजे नीरज चोप्रा. आपल्या कामगिरीने सबंध देशवासियांची मान उंचावण्याचं काम नीरजने केलंय. ज्या क्षणाची भारत 100 वर्ष वाट पहात होता तो क्षण आला. नीरज चोप्राने मिळवलेल्या सुवर्ण पदकाचा आनंद प्रत्येक भारतीय आपापल्या परिने लुटताना पहायला मिळत आहे.

निरजच्या विजयाने त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पण नीरजच्या सुवर्ण पदकाने आनंदी झालेल्या गुजरातमधील एका पेट्रोल पंप मालकाने चक्क आपल्या ग्राहकांना 501 रूपयांचं पेट्रोल मोफत दिलं आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरूचमधील पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल दिलं जाणार आहे अट फक्त एकच आहे की त्या व्यक्तिचं मात्र नीरज असायला हवं.

आपल्या देशाला या आलिंम्पिकने खेळाकडे पहाण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे. सामान्य माणसांना सुद्धा आपण काही तरी क्रिडा क्षेत्रात योगदान द्यायला हवं असं वाटायला लागलं आहे. गावापासून ते शहरापर्यंत प्रत्येकजण नीरजच्या कामगिरीचीच चर्चा करताना पहायला मिळत आहेत आणि शुभेच्छा देत आहे.

आपल्या देशाला यावर्षी आतापर्यंतची सर्वात जास्त पदकं मिळाली आहेत. 1 सुवर्ण, 2 रजत, 4 कास्य मिळाली आहेत. ही कामगिरी सर्वोत्तम आहे. नीरजने सुवर्ण, कुस्तीमध्ये रवी कुमार धहियाने तर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने यांनी रजत मिळवलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, भारतीय पुरुष हॉकी टीम, बॉक्सर लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना कास्य पदक मिळालं.

थोडक्यात बातम्या

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

चिंताजनक! आता डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना अधिक धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More