देश

कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती

नवी दिल्ली | सामान्य माणूस कोरोनाच्या संकटाशी झगडतोय, त्याच्याशी लढा देतोय. या सगळ्या संकटात त्याला इंधन दरवाढीचा शॉक नको, असं वक्तव्य बसपाच्या नेत्या मायावती यांनी केलं आहे. इंधन दरवाढीवरून मायावतींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे .

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आणखी त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत, असं मायावतींनी म्हटलं आहे.

चीनच्या मुद्द्यांवर सध्या देशात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं घाणेरडं राजकारण सुरु आहे. सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.

सध्याच्या काळात ते आजिबात योग्य नाही. यांच्या आपसातील लढाईमध्ये सर्वाधिक नुकसान देशाच्या जनतेचं होतं आहे. यांच्या परस्परांच्या लढाईत जनहिताचे मुद्दे दाबले जात आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असं मायावतींनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या