बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

नवी दिल्ली | काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जयपूरमध्ये बोलताना हिंदू आणि हिंदूत्वादी शब्दावरून भाजपवर (BJP) टीका केली होती. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्ववादी शब्दाचा भेद स्पष्ट करण्याचं प्रयत्न केला होता. त्यावरून आता योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींना झालेला अक्षरसमज आहे. संस्कृती आणि भारतीयत्वाचे आकलन हा खुप मोठा विषय आहे, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी व्यक्ती आणि व्यक्तीमत्व एकच आहे. आता तुम्ही म्हणालात की, व्यक्ती वेगळी आणि व्यक्तीमत्व वेगवेगळे आहेत. ए बावळट, एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसेच हा अक्षरसमज आहे. संस्कृती आणि भारतीयत्वाचे आकलन हा खुप मोठा विषय आहे. रामदेव बाबा यांनी हा राजकीय प्रपोगंडा (Political propaganda) असल्याचं देखील म्हटलं आहे.

हिंदू (Hindu) ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीची जाण असणं हिंदूत्व, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं. सनातनचा अर्थ अनादी काळापासून चालत आलेला आहे. देशात राहणाऱ्या सर्व लोकांनी एका प्रवाहात चालायला हवं, असंही बाबा रामदेव म्हणाले आहेत.एवढं तरी वाचायला हवं इतक बावळ असायला नाही पाहिजे, असंही रामदेव बाबा म्हणाले आहेत.

दरम्यान, 2014 पासून देशात हिंदूत्ववादी सत्तेत आहेत. हिंदू सत्तेबाहेर आहेत. आम्हाला आता हिंदूत्ववादींना हटवून हिंदूना सत्तेत आणायचं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. काँग्रेस पक्षाच्यावतीने जयपूर येथे महागाई हटाओ या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मी हिंदू आहे परंतु, हिंदूत्ववादी नाही. महात्मा गांधी(Mahatma Gandhi) हिंदू होते तर गोडसे (Nathuram Godse) हिंदूत्ववादी होते, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

“मॅचपूर्वी SEX करा”, सचिन-द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता सल्ला

“देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते तेव्हा…”, नवाब मलिकांचा खोचक टोला

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More