बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव समोर येत होतं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. भाजपने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.  यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इथं कुंपणच शेत खात आहे. संजय राठोड दोषी असून चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे, असं दावा नारायण राणे यांनी केला आहे.

भाजपच्या महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरला. आरोप झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून संजय राठोड यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकेचे बाण सोडले नाहीत.

दरम्यान, शिवसेना बलात्कार, खून करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे. विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार. कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही नारायण राणेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात!

संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर

भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड

राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपलं असं होत नाही- प्रविण दरेकर

“जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More