बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

मुंबई | देशात वाढणाऱ्या नक्षलवादी कारवायांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक येत्या रविवारी आयोजित केली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात नक्षलवादी कारवाया वाढल्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील होणाऱ्या नक्षली कारवायांबाबत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली.

ज्या भागात नक्षलवादी कारवाया होत आहेत तिथे विकासकामे देखील थांबली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत नक्षलवादी भागात विकासकामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. शहरी नक्षलवाद प्रकरणामुळे तेलगु कवी वरवरा राव यांना अटक करण्यात आली होती.

आजारी असल्यामुळे वैद्यकीय जामीनावर वरवरा राव यांची सुटका केली आहे. मुंबई उच्चन्यायालयाने कठोर अटी आणि शर्तींवर ही सुटका केली आहे. 25 सप्टेंबर पर्यंत हा जामीन उच्चन्यायालयाने मंजुर केला आहे.परंतु, वरवरा राव यांच्या वकीलांनी मुदत वाढवुन देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नक्षलवादी कारवाई प्रकरणी बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात राजकीय चर्चा होणार काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

थोडक्यात बातम्या –

महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश

“पंडित नेहरू, वाजपेयींकडे जम्मू काश्मीरसाठी जे धोरण होतं ते मोदींकडे नाही”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना आपल्या जन्माच्या आधीपासूनच होता- उदयनराजे भोसले

‘आमच्या आंदोलनानंतर इंदोरीकर महाराजांची 80 टक्के कीर्तने…’; बिग बॉसमध्ये तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More